
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी केल्या आहेत. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी करून सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी आम्ही करू. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचे ठरले, तर तशीही तयारी असेल, तर सर्व पक्षांनी वेगळे लढण्याचा निर्णय झाल्यास आमचीही पूर्ण तयारी आहे; पण यावेळेस उमेदवारीसाठी पक्ष व नेत्याशी एकनिष्ठता आणि निवडून येण्याची क्षमता हे निकष असतील, असे आज खासदार नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.