
कोरेगाव: लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीच्या भूमिका घेतल्या. अजूनही कार्यकर्त्यांत द्विधा मनःस्थिती आहे. काही शरद पवार गटात, तर काही अन्य ठिकाणी अडकले आहेत. मात्र, आता कार्यकर्त्यांनी राजकीय भूमिका, विचारधारा स्पष्टपणे घ्यावी, अशी माझी विनंती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तुम्हाला शक्ती देईन, अशी ग्वाही खासदार नितीन पाटील यांनी दिली.