esakal | माणच्या उपसभापती पदी नितीन राजगे; धनगर समाजाला प्रथमच संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Maan Panchayat committee

माण पंचायत समितीच्या उपसभापती पदी नितीन राजगे यांची आज बिनविरोध निवड झाली.

माणच्या उपसभापती पदी नितीन राजगे; धनगर समाजाला प्रथमच संधी

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : माण पंचायत समितीच्या (Maan Panchayat committee) उपसभापती पदी नितीन राजगे (Deputy Speaker Nitin Rajge) यांची आज बिनविरोध निवड झाली. माणच्या इतिहासात प्रथमच लतिका विरकर (Latika Virkar) यांच्या रुपाने सभापती पद व नितीन राजगे यांच्या रुपाने उपसभापती पद धनगर समाजाला मिळाले आहे. तानाजी कट्टे यांनी वरिष्ठांच्या सूचनेवरून २४ ऑगस्ट रोजी उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. २६ ऑगस्ट रोजी रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज उपसभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

पीठासीन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सदरची सभा सकाळी अकरा वाजता सुरु झाली. सभेस सभापती लतिका विरकर, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे, रमेश पाटोळे, विजयकुमार मगर, नितीन राजगे, तानाजी काटकर, कविता जगदाळे, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्राबाई आटपाडकर उपस्थित होते. उपसभापती पदासाठी नितीन राजगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सदर अर्जावर सूचक म्हणून तानाजी काटकर यांनी सही केली होती.

हेही वाचा: मदन भोसलेंची मनमानी, आक्षेपार्ह व्यवहार

विहित वेळेनंतर शैलेश सूर्यवंशी यांनी नितीन राजगे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नितीन राजगे यांनी या पहिले अडीच वर्षे सुध्दा उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यांना पुन्हा एकदा उपसभापती पदी काम करण्याची संधी मिळाली आहे.

loading image
go to top