सातारकरांनाे ! उद्या पाणी येणार नाही

सातारकरांनाे ! उद्या पाणी येणार नाही
Updated on

सातारा : शहापूर पाणी योजनेतील बिघाड दुरुस्तीचे काम सातारा पालिकेच्या उद्या (शनिवार) देखील करण्यात येणार आहे. या कामामुळे शहापूर योजनेच्या अखत्यारित येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती सातारा नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी पत्रकाव्दारे दिली.
 
शहापूर योजनेच्या रायझिंग मेनच्या गळतीचे काम आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजल्यापासून हाती घेण्यात आले आहे. हे काम उद्या (शनिवार) सकाळी आठपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

उद्या साता-यात राष्ट्रीय लोकअदालत; तडजाेडीने प्रकरणे सुटणार

परिणामी शनिवारी (ता.12) सकाळच्या सत्रात गणेश टाकी, घोरपडे टाकी, बुधवार नाका टाकी, राजवाडा टाकी, यशवंत गार्डन टाकीच्या अखत्यारितील बुधवार, शनिवार, सोमवार, मंगळवार पेठ, वाघाची नळी, पंचपाळी हौद, महात चौक (कमानी हाैद) परिसर, शुक्रवार, सदाशिव, भवानी पेठ तसेच इतर भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे नारकर यांनी सांगितले आहे.

विद्यार्थी हितासाठी साता-याच्या शिक्षणाधिका-यांची शाळा, महाविद्यालयांवर नजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crores Lost as Heavy Winds Rip Off Shed Sheets, Sugar Stock Damaged by Rain
Karad Nandalapur flyover completion update
Dreams Cut Short: 16-Year-Old Student Dies in Head-On Crash Near Banpuri
Mahayuti Stands Together, Says Desai; Voting Decision Left to Eknath Shinde
Marathi News Esakal
www.esakal.com