esakal | सांगलीकरांना दिलासा, कोयनेचे दरवाजे बंद
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीकरांना दिलासा, कोयनेचे दरवाजे बंद

गेल्या 12 तासांत कोयनानगरात 34, नवजात 68, तर महाबळेश्वरला 45 मिलिमटर पावसाची नोंद झाली. 

सांगलीकरांना दिलासा, कोयनेचे दरवाजे बंद

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (जि.सातारा) ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. धरणाच्या परिचलन सूचीप्रमाणे जलपातळी नियंत्रित झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून उघडलेले कोयना धरणाचे दरवाजे गुरुवारी (ता.20) बंद करण्यात आले आहेत.
सेनेचे शंभूराज करणार का जयंत पाटलांची इच्छापूर्ती?  

धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित असून, धरणातून केवळ दोन हजार 100 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 11 हजार 372 क्‍युसेक असून, जलपातळी 2154.6 फूट आहे. धरणात 93.66 टीएमसी पाणीसाठा असून, ते 88.54 टक्के भरले आहे. गेल्या 12 तासांत कोयनानगरात 34, नवजात 68, तर महाबळेश्वरला 45 मिलिमटर पावसाची नोंद झाली. 

वारकरी संप्रदाय युवा मंचचा ठाकरे सरकारला इशारा; काय म्हणाले अक्षयमहाराज वाचा

दरम्यान काेयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद केल्याने कृष्णा नदीचे पाणी आेसरत आहे. यामुळे कराड तालुक्यांतील काही गावांसह सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.

सातारा जिल्ह्यातील ही पालिका आत्मनिर्भर निधी योजनेतून देतेय कर्ज

पोलिसांनी रचला सापळा अन् चोरटा सात महिन्यांनंतर अलगद जाळ्यात फसला 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top