सातारा : ‘आरोग्य’ कर्मचाऱ्यांचेच आरोग्य आले धोक्यात

सुविधा, साहित्‍य मिळत नसल्याने नाराजी
Non-availability of necessary facilities and materials endangers health of health workers satara
Non-availability of necessary facilities and materials endangers health of health workers satarasakal

सातारा : शहरवासीयांच्‍या आरोग्‍याची काळजी घेणाऱ्या आरोग्‍य कर्मचाऱ्यांना कामासाठी आवश्‍‍यक असणारे साहित्‍य पुरविण्‍यास टाळाटाळ होत असल्‍याचे दिसून येत आहे. कामादरम्‍यान, आवश्‍‍यक त्‍या सुविधा आणि साहित्‍य मिळत नसल्‍याने साफसफाईचे काम करणाऱ्या आरोग्‍य कर्मचाऱ्यांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. या अनागोंदी कारभाराबाबत आरोग्‍य कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. याबाबतचे मागणीपत्र त्‍यांनी पालिका प्रशासनास दिले. शहरातील सर्वच प्रभागांत साफसफाई करण्‍यासाठी आरोग्‍य विभागाच्‍या वतीने सुमारे २७५ हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. सकाळी आणि संध्‍याकाळी या दोन सत्रात हे कर्मचारी शहरातील रस्‍त्‍यांची तसेच अन्य ठिकाणांची सफाई करतात.

या कामावर मुकादमामार्फत देखरेख केली जाते. सफाईच्‍या कामादरम्‍यान त्‍यांना अनेकदा दुर्गंधीचा मुकाबला करावा लागतो. त्‍यामुळे कर्मचाऱ्यांचे स्‍वास्‍थ्‍य बिघडू नये, त्‍यांना संसर्गजन्‍य रोगांची लागण होऊ नये, यासाठी त्‍यांना बूट, हँडग्‍लोव्‍हज, साबण, कोयता, चॉपर, कुऱ्हाड, कात्री, घमेली, खोरी, खराटे, टिकाव व अन्य आवश्‍‍यक ते साहित्‍य आरोग्‍य विभागातर्फे पुरविणे आवश्‍‍यक असते. मात्र, गेल्या दोन वर्षांत एकदाही असे साहित्‍य संबंधित कर्मचाऱ्यांना पुरवलेले नाही. कोरोना काळात तर जीव धोक्‍यात टाकून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना फक्‍त प्राधान्‍याने साहित्‍य पुरवले गेले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतरच्‍या काळात असे साहित्‍य पुरविण्‍याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्‍याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. सध्‍या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहराच्‍या विविध भागांत साचणारा कचरा कुजण्‍याची प्रक्रिया अधिक वेगाने होत आहे.

कुजलेल्‍या कचऱ्यामुळे वातावरण दूषित होत असून आरोग्‍य कर्मचाऱ्यांना पावसात भिजतच कचरा संकलन व सफाईचे काम करावे लागत आहे. पावसाळा सुरू होण्‍यापूर्वीच आरोग्‍य कर्मचाऱ्यांना आवश्‍‍यक रेनकोट, इतर साहित्‍य देणे आवश्‍‍यक होते. मात्र, कार्यालयीन सोपस्कारात हा विषय रेंगाळल्‍याची माहिती आरोग्‍य कर्मचाऱ्यांनी दिली. सफाईसाठी आवश्‍‍यक साहित्‍य मिळावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार आरोग्‍य विभागाशी पाठपुरावा केला. मात्र, त्‍यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्‍याने आरोग्‍य कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com