ZP निवडणूक लढविणाऱ्यांसाठी गुडन्यूज! गट-गणांत वाढणार सदस्यांची संख्या

कऱ्हाड, पाटण, फलटण, कोरेगाव, वाई, माण तालुक्यांत वाढणार सदस्यांची संख्या
Satara Zilla Parishad
Satara Zilla Parishadesakal
Summary

राज्य शासनानं जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा : नगरपंचायती (Nagar Panchayat), पालिकांच्या (Satara Municipality) हद्दी वगळून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांची आता नव्याने पुनर्रचना केली जाणार आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या (Panchayat Committee) सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) सदस्यांची संख्या ६४ वरून ७४ वर तर पंचायत समितीची सदस्यसंख्या १२८ वरून १४८ केली आहे. वाढलेली सदस्यसंख्या मोठ्या गट, गणांचे विभाजन करून ‘ॲडजेस्ट’ केली जाणार आहे. त्यामुळे कऱ्हाड, पाटण, फलटण, कोरेगाव, माण, वाई या तालुक्यांत गट व गणांची संख्या वाढणार आहे.

जिल्हा परिषदेचे यापूर्वी ६४ गट होते. यामध्ये सर्वाधिक गटांची संख्या कऱ्हाडात १२ होती. तर त्यापाठोपाठ साताऱ्यात दहा होती, तर फलटण व पाटणमध्ये प्रत्येकी सात होती. पण, नगरपंचायती, पालिकांची हद्दवाढ यामुळे दोन गट, चार गण कमी झाले होते. आता जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी, फेब्रुवारीत होणार आहे. त्यासाठी प्रभागांचे कच्चे प्रारूप करण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला दिले होते. पण, त्यावेळी राज्य सरकारने निर्णय घेत जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५५ तर कमाल ८५ करण्याचा निर्णय घेतला. त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. परिणामी सातारा जिल्ह्यातील गटांची संख्या ७४ तर गणांची संख्या १४८ झाली आहे. त्यामुळे वाढलेले दहा गट व २० गण आता नगरपंचायत, पालिकांची हद्द सोडून ‘ॲडजेस्ट’ करावे लागणार आहेत. त्यासाठी मोठ्या गटांची विभागणी दोन लहान गटांत केली जाणार आहे. तर पंचायत समितीचा गण दोन ते चारच गावांचा होणार आहे. सातारा पालिकेच्या हद्दवाढीमुळे सातारा तालुक्यातील दोन गट व चार गण रद्द झाले आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यातील एखाद्या दुसऱ्या गटाची विभागणी होणार आहे.

त्यासाठी गट, गणांची लोकसंख्या कमी करून त्याची आखणी होणार आहे. यामध्ये पूर्वी ३५ ते ३६ हजार लोकसंख्येचा एक गट होता. तो आता ३० ते ३२ हजार लोकसंख्येचा एक गट होणार आहे. तसेच पूर्वी पंचायत समितीचा गण १८ ते २० हजार लोकसंख्येचा होता. तो आता १५ ते १६ हजार लोकसंख्येचा एक गण तयार केला जाणार आहे. यामध्ये गणांमध्ये गावांची संख्या दोन ते चार गावांची असेल. या विभागणीमुळे गावागावांतील स्थानिक नेत्यांना आता पंचायत समितीवर जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेतही इच्छुकांना जागा उपलब्ध होणार आहेत. सध्या जिल्हा निवडणूक विभागाकडून गट व गणांची पुनर्रचना करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे कोणत्या तालुक्यात किती गट व गण वाढणार, याची उत्सुकता आहे. कऱ्हाड, फलटण, पाटण, माण, कोरेगाव, खटाव, वाई या तालुक्यांतील मोठ्या गट, गणांची विभागणी होऊन त्यांची संख्या वाढणार आहे. सर्वाधिक संख्या कऱ्हाड, फलटण, पाटण व वाई तालुक्यांत होण्याची शक्यता आहे.

तुल्यबळ लढती पाहायला मिळणार

जिल्हा परिषदेच्या गट, गणांची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे मोठ्या गट, गणांचे विभाजन झाल्याने ज्या तालुक्यात गट व गणांची संख्या वाढणार आहे, तेथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना सदस्य होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांना गट, गणांची संख्या वाढलेल्या तालुक्यात लक्ष घालावे लागणार आहे. सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीत स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे सर्वत्र तुल्यबळ लढती पाहायला मिळणार आहेत.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल :

  • राष्ट्रवादी : ४१

  • काँग्रेस : सात

  • भाजप : सहा

  • शिवसेना : दोन

  • पाटण विकास आघाडी : दोन

  • कऱ्हाड विकास आघाडी : तीन

  • सातारा विकास आघाडी : तीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com