ढेबेवाडीतील ‘वन्यजीव’चे स्थलांतर?

स्थानिकांचा विरोध; सांगलीतील मणदुरेला नेणार, अधिकाऱ्यांचा प्रस्ताव
Office of wildlife department in Dhebewadi division is moving to another location
Office of wildlife department in Dhebewadi division is moving to another location

कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी विभागातील वन्यजीव विभागाचे कार्यालय अन्यत्र सांगली जिल्ह्यातील मणदुरे येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या वेळी भाजप सरकारच्या काळात कार्यालय अन्यत्र हलविण्यात येणार होते. मात्र, महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षांच्या काळात त्याला ब्रेक दिला होता. मात्र, शिंदे-भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर कार्यालय हलविण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येते. मणदुरे येथे कार्यालयाचे स्थलांतर झाल्यास पाटण तालुक्याला त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कार्यालय अन्यत्र हलवू नये, अशी त्या भागातील नागरिकांसह निसर्गप्रेमींचीही मागणी आहे.

महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षांत तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील यांनी कार्यालय हलवू नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यास यशही आले होते. नव्या सरकारच्या काळात पुन्हा एकदा त्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सूचना व पत्राकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शंभूराज देसाई यांनी ढेबेवाडी वनक्षेत्रपाल कार्यालय हलवू नये, यासाठीचे केलेले प्रयत्न पाण्यात जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी ढेबेवाडीचे कार्यालय हलविण्याचा पुनर्रचना प्रस्ताव पाठवला आहे. नवीन आलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत यांनीही त्याला दुजोरा देत त्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

विरोध होऊनही स्थलांतराचा घाट

व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील तिन्ही लोकप्रतिनिधींनी लेखी कळवले आहे. पश्चिम विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन व राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून ढेबेवाडीचे कार्यालय आहे तेथेच ठेवण्याची विनंती केली आहे. तरीही त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कार्यालय हलवण्याचा घाट घातला जात आहे. ढेबेवाडी वनपरिक्षेत्र कार्यालय ब्रिटिशकालीन आहे. तेथे ज्‍येष्ठ साहित्यिक तथा निवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनीही योगदान दिले आहे. ढेबेवाडीचे कार्यालय तालुक्यातील मध्यवर्ती कार्यालय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com