कऱ्हाड - कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील नांदगाव येथील ६५ वर्षीय आजीबाई मंगल आवळे यांनी आज रिक्षा चालवण्याच्या परवान्यांसाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, सागर विश्वासराव, सहायक मोटार वाहन निरीक्षक वैभव तोरणे, भारत गोरड यांच्या उपस्थितीत तीन चाकी प्रवासी रिक्षाची आज टेस्ट दिली. त्यामध्ये त्यांना यश आले असुन त्यांचा पक्क्या परवान्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उतरत्या वयातही आज्जीबाईंची जिद्द पाहुन आरटीओ अधिकारीही थक्क झाले.