ओमनी, दुचाकी धडकेत तिघे गंभीर; विजयनगरजवळ समोरासमोर धडक | satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

सातारा : ओमनी, दुचाकी धडकेत तिघे गंभीर; विजयनगरजवळ समोरासमोर धडक

कऱ्हाड : कऱ्हाड-चिपळुण महामार्गावर (Karad-Chiplun Highway) काल रात्री अकराच्या सुमारास ओमनी कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये ओमनी चालक, दुचाकी चालक व पाठीमाने बसलेला एकजण असे तीघे गंभीर जखमी (Seriously injured) झाले. ओमनी चालक असीफ आजीज मुल्ला (वय ३१ - कार्वे नाका कऱ्हाड), विशाल प्रकाश जाधव (२८, शेणोली) व सुनिल दिनकर चव्हाण ३४, कालवडे) अशी जखमींची नावे आहेत. संबंधितांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात (Krishna Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

हेही वाचा: चोरी करून पलायन करणारे पाच सराईत चोरटे करूळ नाक्यावर जेरबंद

पोलिसांची माहिती अशीः कऱ्हाड-चिपळुण महामार्गावर काल रात्री अकराच्या सुमारास पाटणहुन कऱ्हाडकडे निघालेली ओमनी कार (एम एच- 12- एएन-8490) आणि कऱ्हाडवरुन पाटणकडे निघालेली दुचाकी यांच्यात आरटीओ कार्यालयापुढील बाजुस समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांच्या धडकेचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या अपघातात ओमनी गाडीचा चालकाकडील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुचाकीचा पुढील सर्व भाग तुटला आहे. दरम्यान अपघातात ओमनी चालकासह दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. तेथे जमलेल्या नागरीकांनी संबंधित जखमींना तातडीने कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील अपघात विभागाचे हवालदार जाधव, धीरज चतुर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवुन वाहने बाजुला केली. त्यानंतर पंचनामा केला.

Web Title: Omni Bike Accident Three Serious Head Collision Near Vijayanagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraBikesaccident
go to top