याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, बसस्थानकाच्या समोर रस्त्यावर महाबळेश्वर येथून आलेल्या भरधाव वाहनाने (एमएच ०४ जीई ६६९५) रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार ठोकर मारत पुढे जात राहिली.
वाई : येथील बसस्थानकासमोरील रस्त्यावर काल एका भरधाव चारचाकी वाहनाने पादचाऱ्यांना उडविल्याने एक जण जागीच ठार झाला, तर साडेतीन वर्षांच्या लहान मुलासह चार जण गंभीर जखमी झाले. भर गर्दीच्या रस्त्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.