पिंपोडे बुद्रुक : पोलिस हवालदाराने (Police Constable) भरधाव कार चालवून घराबाहेर अंगणात झोपलेल्या व्यक्तीला चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. रमेश लक्ष्मण संकपाळ (वय ५५, रा. सर्कलवाडी) असे मृताचे नाव आहे. सर्कलवाडी (ता. कोरेगाव) येथे आज पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.