Satara Crime : जेवण चांगले केले नाही म्हणून अंगावर रॉकेल ओतून आजीला जाळले; नातवाला जन्मठेपेची शिक्षा

Satara Crime : शरद बजरंग साळुंखे (वय ३६, रा. राजापुरी, ता. सातारा) असे शिक्षा झालेल्या नातवाचे नाव आहे.
Satara Crime
Satara Crimeesakal
Updated on: 
Summary

साक्षीदार सतीश राघू साळुंखे याने खोटी साक्ष दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सातारा : जेवण चांगले केले नाही म्हणून अंगावर रॉकेल ओतून आजीला जाळून मारल्याप्रकरणी (Murder Case) राजापुरी (ता. सातारा) येथील नातवाला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (Judge) व्ही. आर. जोशी यांनी ही शिक्षा सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com