esakal | वशिलेबाजीला बसणार आळा! 'या' शहरांत होणार ऑनलाइन लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Online vaccination campaign

जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून, लशींचे डोसही जादा उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत सात लाख ७३ हजार ७६८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

वशिलेबाजीला बसणार आळा! 'या' शहरांत होणार ऑनलाइन लसीकरण

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : लसीकरण केंद्रावरील (Satara Vaccination Center) गोंधळ टाळण्यासाठी जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण व वाई या शहरात येत्या मंगळवारपासून (ता. १३) ऑनलाइन नोंदणीनुसार लसीकरण (Online vaccination campaign) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रत्येक केंद्रावर लस उपलब्धतेनुसार दुपारी १२ वाजता लसीकरण सत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ऑनलाइन नोंदणीनुसार लसीकरणामुळे केंद्रावरील वशिलेबाजी व स्थानिक पुढाऱ्यांच्या दडपशाहीला आळा बसणार आहे. (Online Covid-19 Vaccination Campaign From Tuesday In Satara Karad Phaltan And Wai Cities)

जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून, लशींचे डोसही जादा उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत सात लाख ७३ हजार ७६८ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, दोन लाख ८ हजार ५०५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. या मोहिमेचा आणखी वेग वाढून केंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी जिल्ह्यातील चार शहरांत ऑनलाइन लसीकरण सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या चारही शहरांतील केंद्रावर ऑनलाइन नोंदणी नसल्यास लस मिळणार नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांनी दररोज १२ वाजता https://selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर लसीकरण सत्र प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाइन नोंदणी (Online registration) करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने (Health Department Satara) केले आहे. उर्वरित इतर शहरी व ग्रामीण भागात लाभार्थ्यांना केंद्रावर टोकण घेऊन लस मिळणार असल्याचे डॉ. प्रमोद शिर्के (Dr. Pramod Shirke) यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: छत्रपतींच्या गादीला डावलण्याचा भाजपचा प्रयत्न

Online Registration

Online Registration

इतर शहरी व ग्रामीण भागात टोकण पद्धत

जिल्ह्यातील संपूर्ण पात्र लाभार्थ्यांना नियोजनबद्ध लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तरावरून योग्य नियोजन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील चार शहरी भागात १०० टक्के ऑनलाइन नोंदणीनुसारच लसीकरण करण्यात येणार आहे, तर उर्वरित इतर शहरी व ग्रामीण भागात लाभार्थ्यांना केंद्रावर टोकण घेऊन लस मिळणार असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले आहे.

Online Covid-19 Vaccination Campaign From Tuesday In Satara Karad Phaltan And Wai Cities

loading image