
मायणी : ऑनलाइन गेममध्ये हरल्याने आर्थिक नुकसान झाले म्हणून एका तरुणाने चक्क दुचाकी चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी वडूज पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. शुभम राजू निकम (वय २०, माऊली, ता. खानापूर, सांगली) असे संशयिताचे नाव आहे.