ग्रामपंचायत निवडणुक लढविणा-यांना सुटी दिवशीही अर्ज भरता येणार

ग्रामपंचायत निवडणुक लढविणा-यांना सुटी दिवशीही अर्ज भरता येणार
Updated on

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी अकरापैकी पाच तालुक्‍यांतून केवळ 15 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. वाई, खंडाळा, पाटण, खटाव, महाबळेश्‍वर व फलटण तालुक्‍यांतून एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान उमेदवारांसाठी शुक्रवार (ता. 25) ते रविवार (ता. 27) दरम्यान सुटीदिवशीही ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्याची पावती 30 डिसेंबरपर्यंत जमा करता येईल, असे क-हाडचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अमरदीप वाकडे यांनी सांगितले. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. एकूण 879 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया होत असून, अर्ज दाखल करण्यासाठी अनेक नियम व अटी असल्याने इच्छुकांनी तहसील कार्यालये, तसेच सेतू केंद्रात गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्‍यांतील 15 उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत. सहा तालुक्‍यांतून एकही अर्ज दाखल झालेला नाही. 
तालुकानिहाय दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे आहे. सातारा एक (कोडोली), कऱ्हाड 9, माण एक (कुळकजाई), कोरेगाव दोन, जावळी दोन, तर खटाव, महाबळेश्‍वर, वाई, खंडाळा, पाटण व फलटण येथून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहात! वेगवेगळ्या प्रभागातून अर्ज भरु नका 

कऱ्हाड : तालुक्‍यातील 104 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या वतीने प्रशासकीय इमारत आणि पंचायत समितीतील चार ठिकाणी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तांबवे ग्रामपंचायतीसाठी विजयसिंह पांडुरंग पाटील, नंदाताई अधिकराव पाटील, धनंजय रघुनाथ ताटे, विठोबा वसंत पाटील, रिसवड ग्रामपंचायतीसाठी पांडुरंग रघुनाथ इंगवले, शंकरराव दिनकरराव इंगवले, सुजाता अशोक इंगवले यांच्यासह पार्ले ग्रामपंचायतीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले.

स्वतःच्या हिंमतीवर व्यवसाय वाढविलेल्या युवकाच्या आत्महत्येने वडूजकर हळहळले 

दरम्यान शुक्रवार ते रविवार पर्यंत सुटी आहे. त्या काळात उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू ठेवण्यात येणार आहे. संबंधितांना ऑनलाइन दाखल केलेल्या अर्जाची पावती 30 डिसेंबपर्यंत सादर करायची आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्‍यक त्या कागदपत्रासह विहीत नमुन्यातील उमेदवारी अर्ज दाखल करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी वाकडे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com