Krishna Factory Election : 'कृष्णा'चा अर्ज दाखल करण्यासाठी आता उमेदवार-सूचकांनाच प्रवेश

Krishna Factory
Krishna Factoryesakal

कऱ्हाड (सातारा) : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी (Yashwantrao Mohite Krishna Co-operative Sugar Factory) अर्ज दाखल करण्याची मुदत एक जूनपर्यंत आहे. त्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी होणाऱ्या गर्दीचा विचार करुन अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उमेदवार किंवा त्यांच्या सूचक यांनाच प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर (Election Officer Prakash Ashtekar) यांनी आज दिली. (Only Candidates Will Get Entry To Fill Application For Krishna Sugar Factory Election Satara Political News)

Summary

कृष्णा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत 113 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

कृष्णा कारखान्याची निवडणूक (Krishna Factory Election) प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत 113 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी एक जूनपर्यंत मुदत आहे. त्यासाठी सोमवारी (ता. ३१) व मंगळवारी (ता. एक) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या कोविड साथीच्या (Coronavirus) अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे.

निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी परिपूर्ण भरलेले अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः किंवा त्यांचे सूचक यापैकी एकानेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे. दोन्ही पैकी एकासच अर्ज दाखल करण्यास प्रवेश दिला जाणार आहे. त्या परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याचीही संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनी केले आहे.

Only Candidates Will Get Entry To Fill Application For Krishna Sugar Factory Election Satara Political News

Krishna Factory
साताऱ्यातील तीन कारखाने 'Top Ten'मध्ये; ऊस गाळपात कृष्णा, जरंडेश्‍वर, सह्याद्रीची बाजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com