
-हेमंत पवार
कऱ्हाड : पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधारकार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे, त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापुढे जे वकील, डॉक्टर, इंजिनिअर आहेत, जे आयकर भरतात, जे पेन्शनर आहेत त्यांनाही यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.