लपून छपून कृत्य करण्यापेक्षा हिम्मत असेल तर पुढं या; माजी मुख्यमंत्र्यांचा फलक फाडल्यानं काँग्रेसचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan

'विरोधकांनी असले लपून छपून कृत्य करण्यापेक्षा हिम्मत असेल तर थेट पुढे यावे.'

'लपून छपून कृत्य करण्यापेक्षा हिम्मत असेल तर पुढं या'

कऱ्हाड (सातारा) : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सैदापूर गावाच्या (Saidapur village) विकास कामांसाठी सुमारे ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीबाबत आमदार चव्हाण यांच्या अभिनंदन व आभाराचे फलक सैदापूर ग्रामस्थ आणि काँग्रेसच्यावतीने लावले आहेत. त्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय (Engineering College) ते आयटीआय मार्गावरील फलक काही समाजकंटकांनी फाडले आहेत. हा प्रकार निंदनीय आहे. त्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हिम्मत असेल तर थेट पुढे यावे, असे आव्हान सैदापूरमधील काँग्रेसप्रेमींनी (Congress) दिले आहे.

आमदार चव्हाण यांनी सैदापूरसाठी नागरी आरोग्य केंद्राला मंजुरी मिळवून दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी ५० लाख तसेच रस्त्यांसाठी काही निधी मंजूर करून दिला. याबद्दल सैदापूर ग्रामस्थ व काँग्रेसप्रेमींनी या परिसरात ठीकठिकाणी आमदार चव्हाण यांचे अभिनंदन व आभाराचे फलक लावले आहेत. त्यातील आयटीआयरोड ते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्गावरील काही फलक फाडण्यात आले. त्याबद्दल कऱ्हाड तालुका काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब जाधव, खादी ग्राम उद्योगचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, माजी उपसरपंच सचिन पाटील, विकास सेवा सोसायटीचे माजी अध्य़क्ष बाळासाहेब प्रल्हाद जाधव, उदय थोरात, धनाजीराव जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी माळी, सुनील जाधव, पांडुरंग जाधव, विवेक जाधव, वैशाली जाधव आदींसह काँग्रेसप्रेमी व ग्रामस्थांनी त्याचा निषेध केला.

हेही वाचा: 'महाविकास आघाडी सरकार पडेल, राणेंच्या रुपानं आणखी एक माणूस आलाय'

यावेळी काँग्रेसप्रेमींच्यवतीने नितेश जाधव म्हणाले, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर परिसरात ६५ लाखांचा निधी दिला आहे. त्याबद्दल आमदार चव्हाण यांच्या अभिनंदनाचे व आभाराचे फलक सैदापुर ग्रामस्थ व काँग्रेसने लावले आहेत. त्यातील काही फलक समाजकंटकांनी फाडले आहेत. त्याविरोधात कऱ्हाड शहर पोलिसात या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याचा तपास होवून यामध्ये जो कोणी दोषी सापडेल, त्याला ग्रामस्थ व कॉंग्रेसप्रेमी योग्य जागा दाखवतील. मात्र, विरोधकांनी असले लपून छपून कृत्य करण्यापेक्षा हिंम्मत असेल तर थेट पुढे यावे. त्याला सामोरे जाण्याची आमच्यात धमक आहे. अशा निंदनीय कृत्य पुन्हा करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची गय केली जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा: मुकेश अंबानींनी 800 रुपयांत काम करणाऱ्या नीताशी का केलं लग्न?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top