
-विश्वनाथ डिगे
मेढा : जावळी तालुक्याला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक विविधता लाभली आहे. येथील डोंगर, नद्या, धबधबे व इतर प्रेक्षणीय स्थळे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. जावळीत वेण्णा नदी ही सर्वात मोठी नदी असून, तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा शहराला लागून ही नदी जाते. त्यामुळे या नदीच्या जलाशयात मेढ्यासारख्या ठिकाणी जलपर्यटन सुरू होण्याची गरज आहे. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल, शिवाय व्यवसायांनाही चालना मिळू शकेल. त्यामुळे यासाठी शासनाच्या पर्यटन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.