esakal | Corona Hotspot : 'आरोग्य'नं कसली कंबर अन् बनपुरीतून पळाला कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Hotspot

गेल्या दीड महिन्यात बनपुरीत कोरोना रुग्णांचा आकडा शंभरीच्या घरात पोचलेला होता.

Corona Hotspot : 'आरोग्य'नं कसली कंबर अन् बनपुरीतून पळाला कोरोना

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी : कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) बनलेल्या बनपुरी (ता. पाटण) येथील हाताबाहेर गेलेली परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आली असून, आरोग्य विभाग (Health Department) व प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना ग्रामस्थांची उशिरा का होईना मिळालेली भक्कम साथ गाव कोरोनामुक्त करण्यास महत्त्वपूर्ण ठरली आहे. (Outbreak Of Coronavirus In Banpuri Village Has Ended Satara Marathi News)

गेल्या दीड महिन्यात बनपुरीत कोरोना रुग्णांचा आकडा शंभरीच्या घरात पोचलेला होता. त्यापैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनेक वाड्यावस्त्यांचा समावेश असलेल्या बनपुरीमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचा कहरच बघायला मिळाला. महिनाभरात कोरोनाचे 96 रुग्ण सापडले. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. या गावातील सव्वाशे लोकवस्तीच्या एकट्या कंकवाडीतच 30 रुग्ण सापडल्याने व त्यातील 15 जण एकाच घरातील असल्यामुळे खळबळ उडाली होती. गेल्या वर्षी कोरोना नियंत्रणासाठी आघाडीवर राहिलेले तेथील काही जण यावेळेस बाधित आढळल्याने सुरवातीला उपाययोजना राबविण्यात ढिलाई दिसून येत होती. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार आदींनी दिलेल्या सूचनांनुसार गावात जनता कर्फ्यूसह विविध उपाययोजना राबविण्यात आल्या.

मार्गदर्शक सदस्य शिवाजी पवार, पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार, ग्रामसेवक तानाजी जाधवर, डॉ. पूनम शिंदे, आरोग्य सेवक एस. एम. भांडे, पाडवी आदींसह आशा व अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, सदस्य, ग्रामस्थ आदींनी एकजुटीने मेहनत घेतली. आरोग्य विभाग व प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना ग्रामस्थांची उशिरा का होईना मिळालेली भक्कम साथ गाव कोरोनामुक्त करण्यास महत्त्वपूर्ण ठरली. विशेष म्हणजे अनेक रुग्ण घरीच विलगीकरणात थांबून बरे झाले. काल गावातील शेवटचा रुग्ण कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.

Outbreak Of Coronavirus In Banpuri Village Has Ended Satara Marathi News

हेही वाचा: 'ओबीसींत फूट पाडणाऱ्या न्या. रोहिणी आयोगास आमचा विरोधच'

loading image