सातारा जिल्ह्यात बाधित संख्या वाढू लागल्याने ऑक्‍सिजन हेल्‍पर्स झाले पुन्‍हा सक्रिय

कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी पुकारलेल्‍या लॉकडाउनमुळे संपूर्ण देशभरातील व्‍यवहार तीन महिन्‍यांसाठी ठप्‍प झाले होते.
oxgyen
oxgyen sakal

सातारा : कोरोनाबाधित(corona patient) रुग्‍ण सापडण्‍याचा वेग वाढू लागल्‍याने प्रशासनासह आरोग्‍य यंत्रणा आवश्‍‍यक उपाययोजना राबविण्‍यासाठी गतिमान झाली आहे. प्रशासन आणि आरोग्‍य यंत्रणांच्‍या मदतीला जिल्ह्या‍तील अनेक स्‍वयंसेवी संस्‍था धावून आल्‍या असून, त्‍यांनी अत्‍यवस्‍थ रुग्‍णांसाठीच्‍या पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन्‍स ऑक्‍सिजन हेल्‍पर्सच्‍या(oxgyen helpers) माध्‍यमातून पुन्‍हा एकदा सज्‍ज करण्‍यास सुरुवात केली आहे. (oxgyen helpers are active covid patient is incerase in satara district)

oxgyen
राजकीय धुरळ्यानं समीकरण बदलणार? थेट भाजप आमदारचं अजितदादांच्या 'प्रेमात'

कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी पुकारलेल्‍या लॉकडाउनमुळे संपूर्ण देशभरातील व्‍यवहार तीन महिन्‍यांसाठी ठप्‍प झाले होते. लसीकरण व इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करत कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यात थोड्याफार प्रमाणात यश आल्‍यानंतर शासनाने अनलॉकची प्रक्रिया जाहीर केली. लॉकडाउन काळात वाढलेल्‍या रुग्‍णसंख्‍येचा प्रचंड ताण आरोग्‍य यंत्रणेवर आला होता. वेळीच कोरोनावरील उपचार न घेतल्‍याने अनेक रुग्‍ण अत्‍यवस्‍थ होत होते. या रुग्‍णांना श्‍‍वास घेण्‍यात अडचणी येऊ लागल्‍याने त्‍यांना व्‍हेंटिलेटरची गरज त्‍यावेळी भासत होती. सर्वच ठिकाणी व्‍हेंटिलेटर उपलब्‍ध नसल्‍याने अत्‍यवस्‍थ रुग्‍णांची हेळसांड सुरू होती. अत्‍यस्‍थ रुग्‍णांची ही हेळसांड कमी होण्‍यासाठी नंतरच्‍या काळात पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिनचा पर्याय पुढे आला.

oxgyen
गोरेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, देशमुख स्वगृही; माण-खटावातील राजकीय समीकरण बदलणार

कोरोनामुळे बाजारपेठा ठप्‍प होऊन अर्थचक्र थांबल्‍याने प्रत्‍येक बाधिताला तसेच त्‍याच्‍या नातेवाईकांना पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन विकत घेणे शक्‍य नव्‍हते. सर्वसामान्‍यांची ही अडचण ओळखून जिह्यातील अनेक स्‍वयंसेवी संस्‍थांनी तशा मशिन्‍स विकत घेत त्‍याचा विनामोबदला पुरवठा अत्‍यवस्‍थ रुग्‍णांना सुरू केला. या सुविधेमुळे हॉस्‍पिटलमध्‍ये व्‍हेंटिलेटर बेड उपलब्‍ध होर्इपर्यंत अत्‍यवस्‍थ रुग्‍णास श्‍‍वासांचा आधार मिळाला. या मशिन्‍सची उपयुक्‍तता लक्षात आल्‍याने नंतरच्‍या काळात त्‍यासाठीचे स्‍वतंत्र धोरण शासनाने जाहीर केले. आजमितीला जिल्ह्यात अशा प्रकारची २०० हून अधिक पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन्‍स विविध स्‍वयंसेवी संस्‍था, व्‍यक्‍ती आणि इतरांच्‍या ताब्‍यात आहेत. बाधितांची संख्‍या तसेच अत्‍यवस्‍थ रुग्‍ण कमी झाल्‍याने मध्‍यंतरीच्‍या काळात त्‍या मशिन्‍सचा वापर कमी झाला होता. आरोग्‍य विभागाच्‍या अंदाजानुसार सध्‍या कोरोना तसेच ओमिक्रॉन बाधितांची संख्‍या पुन्‍हा एकदा वाढीस लागली आहे.

वाढणाऱ्या बाधित संख्‍येमुळे आरोग्‍य यंत्रणा सक्रिय झाली असून, त्‍यांना स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या ऑक्‍सिजन हेल्‍पर्स मदतीचा हात देऊ केला आहे. ‍सद्य:स्‍थितीत जिल्‍ह्यात वाढणाऱ्या बाधितांची आकडेवारी, उपलब्‍ध आरोग्‍य सुविधा यावर ऑक्‍सिजन हेल्‍पर्सनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी ऑक्‍सिजन क्‍लब नावाचा समूह सक्रिय झाला असून त्‍यांनी २०० ऑक्‍सिजन मशिनच्‍या सज्‍जतेवर भर दिला आहे.

oxgyen
ओबीसीच्या या चार जागा होणार कमी!,  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बदलणार समीकरण

कोरोनाबाधितांची संख्‍या पुन्‍हा वाढू लागल्‍याने आरोग्‍य यंत्रणा सक्रिय झालेली आहे. मध्‍यंतरी अत्‍यवस्‍थ रुग्‍णांना पोर्टेबल मशिनव्‍दारे ऑक्‍सिजन पुरवठा करण्‍यात येत होता. बाधित आणि अत्‍यवस्‍थांचे प्रमाण कमी झाल्‍याने मशिन्‍सचा वापर नंतर कमी झाला. आता पुन्‍हा एकदा कोरोना संसर्ग वाढत असल्‍याने जिल्‍हाभरातील मशिन्‍स वापरासाठी सज्‍ज करण्‍यावर आम्‍ही भर देत आहोत.

-ॲड. विनित पाटील, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com