Pachwad Khed State Highway Accident
esakal
कास (सातारा) : कोकणाला जोडणाऱ्या पाचवड ते खेड या राज्य महामार्गाचे (Pachwad–Khed State Highway) काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात ठेकेदाराकडून विशेष अशी काळजी घेतली जात नसल्यामुळे वारंवार या रस्त्यावर अपघात होऊ लागले आहेत. ठेकेदाराचा हलगर्जीपणा वाहनधारकांच्या जिवावर बेतू लागला आहे. यातच काल सकाळी अकराच्या सुमारास मेढा शहराच्या वरच्या बाजूला असलेल्या मानकुमरे पॉइंटजवळ एमएच १४ एमव्ही ७३०७ ही कार चालकाला रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खडीचा अंदाज न आल्यामुळे थेट रस्त्याच्या एका साइडला धडकून पलटी झाली.