

Satara Crime
sakal
उंब्रज, : पाल (ता. कऱ्हाड) येथे दोन गटांत झालेल्या मारामारीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, गणेशाेत्सव काळात गावातील हा तणाव वाढू नये, यासाठी गावातील ज्येष्ठांसह मंडळांचे कार्यकर्ते व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन गणेश मंडळांनी आज दीड दिवसात गणेशमूर्ती विसर्जनाचा निर्णय घेऊन विसर्जन केले. दरम्यान, गावात झालेल्या मारामारीत सहा जण जखमी झाले असून, परस्परविरोधी फिर्यादीवरून चौदा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.