महाबळेश्‍वरला घरपट्टीत पाच टक्क्यांपर्यंत सूट

पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचा निर्णय; एप्रिलपासून होणार अंमलबजावणी
property tax
property taxsakal
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील पर्यावरणपूरक इमारती व नियम पाळणाऱ्या मिळकतधारकांना नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या निर्णयामुळे घरपट्टीमध्ये सुमारे पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या निर्णयाची एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.

महाबळेश्वर पालिका हद्दीतील मिळकतधारकांना येथील बांधकामातील पर्यावरणपूरक नियम पाळल्यास सुमारे ५ टक्क्यांपर्यंत घरपट्टीमध्ये सूट मिळण्यासाठी मुख्याधिकारी पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत केला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवकांनी चार वर्षांपूर्वी घरपट्टी वाढीसंदर्भात चुकीच्या पध्दतीने निर्णय घेतल्याने मिळकतधारकांचे धाबे दणाणले होते. अनेकांच्या मिळकतींना सुमारे दहा पटीपेक्षा जास्त घरपट्टीच्या दरामध्ये वाढीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे अनेक मिळकतधारकांना न्यायालयात जावे लागले होते. त्याचा पालिकेच्या वसुलीवरही परिणाम झाला. पालिकेला पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने पालिकेचा उदरनिर्वाह होत असल्याने त्याची झळ पालिकेला लागली नसली तरी, पालिकेच्या मुख्य आर्थिक स्‍त्रोताची बाजू अडचणीत आलेली आहे.

महाबळेश्वर हे पावसाचे आगार आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. परंतु, पडणाऱ्या पावसाचे पाणी हे डोंगर उताराने वाहून जाते. सध्या वाढत असलेली लोकसंख्येला व येणाऱ्या लाखो पर्यटकांना वापरासाठी पाणी कमी पडू नये, यासाठी केवळ पाणी साठवणूक करून चालणार नाही तर जमिनीत पाणी मुरविणेही गरजेचे असल्याचे महत्त्‍व नागरिकांना कळावे, यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी घरपट्टीमध्ये रेनवॅाटर हार्वेस्टिंगसाठी एक टक्का सूट जाहीर केली आहे. आपल्या इमारतीवर सौर ऊर्जेचा वापर करून पारंपरिक ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना एक टक्का सूट, घरगुती किंवा व्यावसायिक वापरामध्ये इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणाऱ्यांना दोन टक्के सूट अशी एकूण चार टक्के सूट जाहीर केली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार घरपट्टीची मागणी पालिकेने केल्यानंतर ती १५ दिवसांत भरल्यास आणखी एक टक्का सूट मिळत असल्याने घरपट्टीमध्ये भरघोस अशी पाच टक्के सूट मिळकतधारकांना मिळणार आहे.

नागरिकांतून समाधान

पालिकेच्या आर्थिक व मुख्य स्‍त्रोत असलेल्या घरपट्टीबाबत अशा प्रकारे सकारात्मक निर्णय घेतल्याने मुख्याधिकारी पाटील यांच्या कामाबाबत सामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे. पालिकेत केवळ राजकारण करण्याऐवजी समाजोपयोगी कामेही होऊ शकतात, हे प्रशासक म्हणून पालिकेचा कारभार पाहात असलेल्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दाखवून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com