
आनेवाडी : ग्रामपरी संस्था पाचगणीच्या माध्यमातून पुनर्वसित पानस गावात सेंद्रिय परसबाग निर्मितीचा अभिनव प्रयोग राबवला जात आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यातून गावचा सेंद्रिय परसबागेचे गाव म्हणून सर्वत्र नावलौकिक होत आहे. परदेशातील नागरिकांनी व शेती तज्ज्ञांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आहे.