Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Gas Shortage Hits Hotels and Food Stalls in Panchgani: पाचगणीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हॉटेल आणि फूड स्टॉल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. गॅसअभावी अनेक ठिकाणी लाकडी चुलींवर स्वयंपाक सुरू असून पर्यटकांना सेवा देताना व्यावसायिकांची मोठी कसरत होत आहे.
Panchgani Gas Shortage

Panchgani Gas Shortage

esakal

Updated on

पाचगणी: हवेतील गारवा आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या पाचगणी शहरात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि छोटे खाद्य विक्रेते अक्षरशः हवालदिल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळित झाल्याने आधुनिक गॅस शेगड्यांच्या जागी आता पुन्हा धूर ओकणाऱ्या पारंपरिक लाकडी चुली पेटल्याचे चित्र पर्यटननगरीत पाहायला मिळत आहे. यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक गणित तर बिघडलेच आहे, शिवाय पर्यटकांना सेवा देतानाही त्यांची मोठी कसरत होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com