
- रविकांत बेलोशे
भोसे : मानवी हिंस्रवृत्तीने आग लावली अन् अख्या डोंगररांगा आगीने लपेटल्या... वनप्रेमी ही आग विझविण्यासाठी धडपडू लागले... या आगीच्या ज्वाळांनी अनेक पक्ष्यांची फडफड थांबली... हिरवीगार वनसंपत्ती होरपळली... डोंगर जळून खाक झाला. ही स्थिती आहे पाचगणी- भिलार परिसरातील पेटलेल्या डोंगराची.