esakal | 'कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशीला पिळ मारणारे घरात'
sakal

बोलून बातमी शोधा

'कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशीला पिळ मारणारे घरात'

वीज वितरणचे कर्मचारी घरात वीजबिल तोडण्यासाठी आले आणि वीज तोडण्याचा प्रयत्न केला तर ती वीज जोडून देण्याचे काम बळीराजा शेतकरी संघटना करील असा इशाराही देण्यात आला.

'कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशीला पिळ मारणारे घरात'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनामुळे राज्यातील शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असताना सरकार चुकीच्या पध्दतीने भरमसाट व्याज लावून वीजबिलाच्या वसुलीतून शेतकऱ्यांची लूट करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शब्दाला पक्के होते. मात्र, मुख्यमंत्री हे लबाड असल्याची टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी येथे केली.
 
बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने वीज कनेक्‍शन तोडणी विरोधात वीज बिले फाडून दत्त चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने नुकतेच विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, शेकापचे ऍड. समीर देसाई, माणिक अवघडे, राज्य संघटक दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंजाबराव पाटील म्हणाले, ""कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाच वीजबिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. ती खपवून घेतली जाणार नाही. सध्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल भरू नये, असे आम्ही जाहीर करत आहोत. मुख्यमंत्री लबाड आहेत. या मुख्यमंत्र्यांनी गेल्यावर्षी नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार देण्याची घोषणा केली. मात्र, आजअखेर एक कवडीही मिळाली नाही. वीज वितरणचे कर्मचारी घरात वीजबिल तोडण्यासाठी आले आणि वीज तोडण्याचा प्रयत्न केला तर ती वीज जोडून देण्याचे काम बळीराजा शेतकरी संघटना करील.'' शेतकरी अडचणीत असताना कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशीला पिळ मारणारे घरात बसलेले आहेत, अशीही टीका खासदार उदयनराजे भोसले व खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर पाटील यांनी केली. 

आपला पैसा आपल्या कामी: महावितरणची योजना; गावांसह शेतकऱ्यांनाही फायदा

महाराष्ट्रातील मावळ्याने आफ्रिकेतील शिखरावर फडकावला तिरंगा

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा झाला निर्णय

साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पाच लाखांचे दागिने लंपास

कोरोनाचा उद्रेक : सातारा जिल्ह्यातील दहिवडी शहरच कंटेन्मेंट झोन घोषित

Edited By : Siddharth Latkar