काले-कऱ्हाड-मसूर बस केव्हा सुरु हाेणार?

दिलीपकुमार चिंचकर 
Friday, 30 October 2020

काले-कऱ्हाड- मसूर ही शटल बससेवा लॉकडाउनपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

कऱ्हाड : काले-कऱ्हाड- मसूर ही शटल बससेवा लॉकडाउनपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. काले विभागातून रोजचे हजारो लोक व्यवसाय, नोकरी व अन्य कारणांसाठी कऱ्हाडला येतात. महिला, युवा, ज्येष्ठ, अपंग अन्य प्रवासी दररोज एसटीने प्रवास करतात; परंतु सध्या बससेवा बंद असल्याने प्रवाशांना येणे- जाणे करता येत नाही.

तालुक्यातील मसूर, किवळ परिसर, काेपर्डे त्याचप्रमाणे काले विभागातील सुमारे 15 ते 20 गावांतील नागरिक हे दवाखाने तसेच इतर गरजांसाठी क-हाड बाजारपेठेत येत असतात. मात्र सध्या एसटीच्या बस सुरु नसल्याने विशेषतः महिला आणि ज्येष्ठ रुग्णांना क-हाडला जाणे त्रासाचे हाेते.  

सर्वांकडे खासगी वाहने नाहीत. याबराेबरच बेकायदेशीर खासगी वाहतूक करणारी वाहने आहेत. परंतु त्यासाठी प्रवाशांना दुप्पट पैसे माेजावे लागत आहेत. त्याशिवाय या वाहनांतून साेशल डिस्टिंसचे पालन हाेत नाही. अशा अनेक अडचणींना नागरिकांना सामाेरे जावे लागत आहे. त्याचा विचार करून तातडीने एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers are facing major inconvenience as the shuttle bus service from Kale Karhad Masur is closed due to lockdown