
कोरेगाव : येथील आगाराच्या सातारा- हैदराबाद स्लीपर कोच बसचे ब्रेक लागत नसल्याच्या कारणावरून प्रवाशांना काल रात्री अखेर कोरेगाव ते सोलापूर साध्या बसने, पुढे सोलापूर ते हैदराबादपर्यंत स्लीपर कोचने असा ‘द्रविडी प्राणायाम’ करत प्रवास करावा लागला.
यामध्ये प्रवाशांचा वेळ तर गेलाच; पण प्रचंड मानसिक त्रास सोसावा लागला. मात्र, कोरेगाव आगार व्यवस्थापनाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नादुरुस्त बस दिलीच कशी? बसचा अपघात झाला असता तर जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल बसमधील प्रवाशांनी व्यक्त केला.