आंबेघरसह मिरगाव, ढोकवळेत 30 बेपत्तापैकी 29 मृतदेहांचा शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Patan Taluka Landslide

आंबेघरच्या भूस्खलनात नऊ महिन्यांची मुलगी हर्षदा कोळेकरचा अद्यापही बेपत्ता आहे. तीची शोध मोहीम काल थांबविण्यात आली.

आंबेघरसह मिरगाव, ढोकवळेत 30 बेपत्तापैकी 29 मृतदेहांचा शोध

मोरगिरी/कोयनानगर (सातारा) : तालुक्यातील (Patan Taluka Landslide) तीन ठिकाणच्या भूस्खलनाच्या घटनेत आजअखेर बेपत्ता असलेल्या ३० पैकी २९ जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले. ३० बेपत्तापैकी आंबेघरला १४ (Landslide Ambeghar), मिरगवाला ११ तर ढोकवळे चार मृतदेह सापडले. त्यात आंबेघरला येथे अवघ्या नऊ महिन्याचा बालकाचा अद्यापही शोध लागलेला नाही, बालकाच्या पालकांची परवानगी घेवून ती शोध मोहीम थांबवण्यात आली, तर मिरगावात आज आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे आंबेघरसहीत मिरगाव येथील शोधकार्य संपल्याने तेथील बचावकार्यही काल थांबवण्यात आले. दोन्ही ठिकाणच्या एनडीआरफची पथके (NDRF Team) परत रवाना झाल्या. (Patan Landslide NDRF Team Succeeds In Finding 29 Dead Bodies In Ambeghar Mirgaon Dhokwale Villages)

मोरगिरी : आंबेघरच्या भूस्खलनात नऊ महिन्यांची मुलगी हर्षदा कोळेकरचा अद्यापही बेपत्ता आहे. तीची शोध मोहीम काल थांबविण्यात आली. एनडीआरएफचे पथक आणि स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात अपेक्षित यश आले नाही. चिखल व पावसाने शोध मोहीम थांबवण्याचे ग्रामस्थांना लेखी पत्र दिले. त्यानंतर तहसीलदार योगेश टोम्पे यांनी शोध मोहीम थांबवली थांबवली. शोध मोहीम थांबल्यानंतर मात्र आंबेघर आता सुन्न झाले आहे. कोळेकर कुटुंबावर काळानं घाला घातला आणि अख्खं दुर्घटनेत कूटुंब संपले आहे. सतरा ते अठरा म्हैशींचा श्वास कायमचा मातीत दबला आहे. दुर्घटनेतील जखमीवर प्राथमिक उपचार करण्याचे काम मोरगिरी‌ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल यादव यांनी केले. तहसीलदार टोम्पे. गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे अखेरपर्यंत घटनास्थळी होते. पेठ शिवापूर येथील ग्रामस्थांनी कपडे, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंची आंबेघरवासीयांना मदत केली. त्यासाठी ग्रामस्थांची बैठक होवून मदतीचा निर्णय झाला. स्थलांतरीत कुटुंबांना तात्पुरता निवारा मिळाला आहे. आता खरी गरज आहे. नव्या उमेदीने स्वःताला सावरण्याची आणि भक्कम आधाराची.

Landslide Ambeghar

Landslide Ambeghar

हेही वाचा: PM योजनेतून आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करु; रामदास आठवलेंची ग्वाही

कोयनानगर : भूस्खलन झालेल्या मिरगावात चिखलात दबलेल्या आणखी दोन मृतदेह काल शोधण्यात बचावकार्याला यश आले. देवजी बापू बाकाडे व शेवताबाई देवजी बाकाडे अशी त्यांची नावे आहेत. भूस्खलनातील मदतकार्य तिसऱ्या दिवशी सुरू होते. मात्र, अकराही बेपत्ता मृतदेह सापडल्याने मिरगावचे बचाव कार्यही थांबविण्यात आले. आणखी दोन मृतदेह शोधण्याच्या कार्यात एनडीआरफच्या पथकाला यश आले. अकेर तेथील बेपत्ता सर्वांचेच मृतदेह सापडल्याने ती शोध मोहीम थांबवली. काल रात्री दोन, परवा रात्री ढोकावळेत चार मृतदेह बाहेर सापडले होते. एनडीआरफ, स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिकांनी लावल्याने परवा रात्री ढोकवळे तर आज मिरगावचे मदत व शोध कार्य थांबविण्यात आले. पावसाने उघडीप दिल्याने एनडीआरएफच्या काल मिरगावातील आणकी दोन मृतदेह बाहेर काढल्याने तेथील शोध मोहीम थांबविण्यात आली. मिरगावात एनडीआरफसहीत स्थानिक व स्वयंसेवकांची मदत कार्य अखेर आज थांबले. दिवसभराच्या शोध मोहिमेत दोघांचे मृतदेह सापडले. स्थानिक पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अनेक गावात अतिवृष्टी आहे. त्यामुळे तेथे सुविधा पुरविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा: अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना मिळणार 7 लाख

गावातील लोकांचा संसार अचानक उध्वस्त झाल्याचे त्यांनी डोळ्यांनी पाहिले आहे. ते सोप्पे नाही, गावाबरोबर कितीतरी आठवणी जोडलेल्या असतात. त्या इतक्या सहजपणे विसरणे सोपे नाही. गावाकडे पाहता अजून किती काय काय उभं करायचंय याचे हिशोब मन मांडत राहत असून पुनर्वसन हिच‌ आता एकमेव मागणी असल्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखी घेतला आहे.

-जयवंतशेठ कोळेकर, ग्रामस्थ आंबेघर

Patan Landslide NDRF Team Succeeds In Finding 29 Dead Bodies In Ambeghar Mirgaon Dhokwale Villages

टॅग्स :NDRF team