अवैध पिस्तूलप्रकरणी पाटणला एकास अटक

जालिंदर सत्रे
Saturday, 17 October 2020

पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्या ठिकाणी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने एक जण संशयितरीत्या वावरताना दिसला. त्याला चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना सहायक पोलिस निरीक्षक माळी व त्यांच्या पथकाने घेराव घालून त्याला शिताफीने पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावटी बनावटीची पिस्तूल व त्यात तीन जिवंत काडसुते मिळून आली.

पाटण (जि. सातारा) : अवैध पिस्तूल व तीन जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकास येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत माळी व त्यांच्या पथकाने शिताफीने आज (शनिवारी) अटक केली. जोतिराम ऊर्फ सागर दत्तात्रय शितोळे (वय 26. रा. जंगलवाडी, ता. पाटण) असे संबंधित संशयिताचे नाव असून, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिसांची माहिती अशी, पाटण शहरातील एका बारजवळ कमरेला पिस्तूल लावून एक जण थांबल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली. त्यांनी श्री. माळी यांना संबंधितास ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक माळी यांनी हवालदार राजेंद्र पगडे, मुकेश मोरे, अजित पवार, उमेश मोरे, प्रशांत माने यांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्या ठिकाणी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने एक जण संशयितरीत्या वावरताना दिसला. त्याला चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना सहायक पोलिस निरीक्षक माळी व त्यांच्या पथकाने घेराव घालून त्याला शिताफीने पकडले. 

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कावीळ, जगच दिसू लागलंय पिवळं : नगराध्यक्षांचा सडेतोड पलटवार

त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावटी बनावटीची पिस्तूल व त्यात तीन जिवंत काडसुते मिळून आली. पोलिसांनी संबंधिताकडे परवान्याची विचारणा केल्यावर त्याने परवाना नसलेल्याचे सांगितले. संबंधित संशयित हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याकडून कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा होऊ नये, याकरिता बेकायदेशीर पिस्तूल बाळगले म्हणून त्यास अटक करण्यात आली. त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितास न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायलायने सुनावली आहे. पी. व्ही. पाटील तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patan Police Arrested One Person Satara News