मोदी सरकारचा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट; पाटणात कॉंग्रेसतर्फे निषेध

राजेश पाटील
Friday, 16 October 2020

केंद्र शासनाच्या कृषी विधेयकावर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सूचनेनुसार प्रदेश कॉंग्रेसने राज्यभर शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन केले आहे. पाटण तालुका कॉंग्रेस समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ढेबेवाडीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे त्यामध्ये सहभागी झाले होते.

ढेबेवाडी (जि. सातारा) : कॉंग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी बचाव रॅलीत पाटण तालुका कॉंग्रेस समितीने ऑनलाइन सहभाग नोंदवत केंद्र शासनाच्या कृषीविषयक धोरणांचा निषेध नोंदविला. 

केंद्र शासनाच्या कृषी विधेयकावर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सूचनेनुसार प्रदेश कॉंग्रेसने राज्यभर शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन केले आहे. पाटण तालुका कॉंग्रेस समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ढेबेवाडीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे त्यामध्ये सहभागी झाले होते. कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी रजनीताई पवार, युवक कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस अभिजित पाटील, महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा वंदनाताई आचरे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटणकर, सदाशिव कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादासाहेब साळुंखे, अरविंद कुंभार, सुहासचंद्र पाटील, कुमार कांबळे, विकास पाटील, संजय काळुगडे, सचिन देसाई आदी उपस्थित होते. 

खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, पिकांचे मोठे नुकसान

हिंदुराव पाटील म्हणाले, "कॉंग्रेस पक्षाने तयार केलेले कृषिविषयक कायदे सध्याच्या केंद्रातील सरकारने मोडीत काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे. कॉंग्रेस पक्ष हा डाव हाणून पाडेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी कॉंग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Patan Taluka Congress Committee Registered Online Participation In The Congress Rally Satara News