..अखेर NDRF आंबेघरात पोहोचली

NDRF Team
NDRF Teamesakal

मोरगिरी (सातारा) : मुसळधार पावसाने भूस्खलनात (Patan Taluka Landslide) गाडले गेलेल्या तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी (Landslide in Aambeghar) गावात मदत कार्यास स्थानिक स्वयंसेवकांसह एनडीआरएफच्या (NDRF Team) पुढाकाराने सुरवात झाली. दुपार एकवाजेपर्यंत सहा मृतदेह शोधण्यात यश आले. त्यात दोन लहान मुलींचाही समावेश होता. गावात साचलेला राडारोडामुळे मदत कार्यात अडचण येत होती. गावात दोन किलोमीटर अळीकडून चालत जावे लागते. दुपारी जिल्हाधिकारी शेखर सिंह येथे पोचले. त्यांनीही गावाला भेट दिली आहे. (Patan Taluka Landslide NDRF Team Succeed In Finding Six Dead Bodies At Ambeghar bam92)

Summary

मुसळधार पावसाने भूस्खलनात गाडले गेलेल्या तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी गावात मदत कार्यास एनडीआरएफच्या (NDRF Team) पुढाकाराने सुरवात झाली आहे.

तहसीलदार योगेश्वर टोम्पे व त्यांचेही सहकारी तेथे मदत कार्यात सहभागी होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास एनडीआरएफचे पथकही पोचले. दुपारी एक वाजेपर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अद्यापही सहा जण बेपत्ता आहेत. भूस्खलनाने येथे मोठ्या प्रमाणात राडारोड आहे. जवळपास तीस फुटाच्या आसपासचा राडारोडा हलविल्यानंतर मृतदेह सापडले आहे. तेथील स्थिती अत्यंत विदारक होती. स्वयंसेवकांनी खोऱ्यांसह मदतीने चिखल हलविला. आंबेघरकडे येणाऱ्या रस्त्यावरील नदीचे पाणी ओसरल्याने थेट वाट होती. त्यामुळे जिल्ह्यातील स्वयंसेवक येथे सकाळपासून दाखल झाले होते. सातारा, कऱ्हाडसह जिल्ह्याच्या अन्य भागातूनही अनेकजण मदतीसाठी धावले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गतीने मदतकार्य राबविण्याचे काम सुरू होते. अवघ्या १० उंबऱ्याच्या आंबेघर तर्फ मरली गावात काल पहाटे भूस्खलन झाले. डोंगराचा मोठा भाग कोसलळ्याने गावातील गावात ​चार कुटुंब गुराढोरासहित वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. चार कुटुंबातील १४ जण बेपत्ता आहेत. भूस्खलनाने राडोरोड्यात ती गाडली गेली असावीत, अशी भीती व्यक्त होत होती. ती आज खरी ठरली. गावाला चारही बाजूने पाण्याने वेढल्याने तेथे काल कोणतेच मदत कार्य पोचू शकली नाही, तर आज तेथील राडारोडामुळे मदत कार्यात अडचण येत होती.

Landslide Ambeghar
Landslide Ambeghar

काल एनडीआरएफचे पथकही मदतीस पोचू शकले नव्हते. आंबेघरला येणाऱ्या दोन्ही मार्गावरील पूल पाण्याखाली गेले होते. दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला असतानाच भूस्खलनाचा धोक्यात गाव वाहून गेले होते. गावातील १० पैकी सहा कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात स्थानिकांना पातळीवर लोकांना यश आले. पहाटे दोननंतर अंधारात झालेले गोंधळ उडाला. भूस्खलनात चार कुटुंब त्याच बेपत्ता आहेत. कोसळलेल्या डोंगर गावात संकट घेऊन आला. त्या डोंगराच्या राडारोडामध्ये आख्खं गाव गडप झालं, त्यामध्ये ही चार कुटुंब त्यांच्या गुराढोरासहीत गाडल्याची भीती तहसीलदार योगेश टोम्पे यांनी व्यक्त केली होती. आंबेघरला लागून असलेला डोंगर कोसळने गावाच्या अलीकडे तीन किलोमीटरपर्यंत राडारोडा पसरला होता. सर्वत्र चिखलाचा खच होता. त्यामुळे जेसीबीसह कोणतीच यंत्रणा कोणती तेथे पोहोचू शकली नाही.

NDRF Team
ढिगाऱ्यात दबलेल्या कोंढावळेकरांच्या मदतीला धावला 'देवमाणूस'

परिणामी, स्थानिक नागरिकांनी एकमेकाला मदत करत सहा कुटुंबांना जीवदान मिळाले. त्यांना गोकुळ येथे सुरक्षित स्थळी हलवले आहे. चार कुटुंबातील किमान १४ सदस्य बेपत्ता आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कालपासून एनडीआरएफचे शर्थीचे आंबेघरला पाठवण्याचे प्रयत्न सुरू होते. मुसळधार पावसासह सर्वच पूल पाण्याखाली गेल्याने त्या पथकाला गावात पोचण्यास अडचणी येत होत्या. मात्र, पावसाने आज उंसत दिली, तर नद्यांचेही पाणी ओसरल्याने थोडासा दिलासा मिळाला. एनडीआरएफच्या पथकासहीत जिल्ह्यातील विविध संस्थाचे स्वेयसेवकही आंबेघरला पोचले. तहसीलदार टोपे पोचले आहेत. स्थानिकांच्या सहकार्याने मदत कार्य सुरू झाले. त्यावेळी येणारे स्वयंसेवकही हातभार लावत होते. त्याचवेळी एनडीआरएफचे पथकही तेथे पोचले. सर्वांच्या मदतीने दुपारपर्तंय तेथून सहा मृतदेह शोधण्यास त्यांना यश आले. त्यात दोन लहान मुलींचाही समावेश आहे. अधिक गतीने शोधकार्य सुरू होते. जेसीबीसहीत लोकही तेथे हातभार लावत होते.

NDRF Team
NDRF Team

एनडीआरएफचे पथक येथे पोचले आहे. त्यापूर्वीच येथे मदत कार्य सुरू झाले आहे. मात्र, पथक आल्याने त्याला गती आली आहे. राडरोडा व मलमा हटवून सहा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्यापही आठजण बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे.

-योगेश्वर टोम्पे, तहसीलदार, पाटण

Patan Taluka Landslide NDRF Team Succeed In Finding Six Dead Bodies At Ambeghar bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com