मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीयमंत्री आज सातारा दौऱ्यावर

Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackerayesakal

सातारा : जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain In Satara) पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून मौजे आंबेघर, मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे आज सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार असून दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून त्यांचे ११.३० वाजता कोयनानगर येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. शिवाय आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) हे देखील सातारा, सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यार येणार आहेत. (Patan Taluka Landslide Uddhav Thackeray Ajit Pawar And Ramdas Athavale Will Visit Satara District Today bam92)

Summary

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ११.४० वाजता कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देतील व पूरग्रस्तांची विचारपूस करतील. तद्नंतर दुपारी १२.१५ वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली आहे. शिवाय, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांची पत्रकार परिषद आज दुपारी तीन वाजता सर्किट हाऊस होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
पोलिस पाटील गावकऱ्यांसाठी ठरले 'देवदूत'

सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाई (Wai), पाटण (Patana), महाबळेश्वर (Mahabaleshwar), सातारा (Satara), जावली (Jawali) तालुक्यातील भूस्खलनामुळे २६ जण, छत पडून १ जण, २ जण दरड (Land Slide) कोसळल्यामुळे, तर ८ जणांचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे. असे एकूण ३७ जणांचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. वाई तालुक्यातील ३ जण, जावली तालुक्यातील ४ जण, पाटण तालुक्यातील २७ जण, सातारा तालुक्यातील २ जण, तर महाबळेश्वर तालुक्यातील १ जणांचा मृत्यु झाला आहे. वाई तालुक्यातील कोंढावळे येथील २ महिलांचा भूस्खलनामुळे तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यू झाला आहे. जावली तालुक्यातील रेंगडी येथील २ महिला व वाटंबे येथील एका पुरुषाचा, तर मेढा येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यु झाला आहे. पाटण तालुक्यातील बोंद्री येथील एक पुरुष, जळव येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला, तर मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

Patan Taluka Landslide Uddhav Thackeray Ajit Pawar And Ramdas Athavale Will Visit Satara District Today bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com