esakal | Good News : आता बालकांना दिली जाणार PCV लस
sakal

बोलून बातमी शोधा

PCV Vaccine

पाच वर्षांखालील बालकांचे विविध संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण केले जाते.

Good News : आता बालकांना दिली जाणार PCV लस

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : पाच वर्षांखालील बालकांचे विविध संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण (Covid-19 Vaccination) केले जाते. यामध्ये आता न्युमोशेकल या आजारांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता न्युमोशेकल कॉज्युगेट व्हॅक्सिन (Pneumococcal conjugate vaccine) (पीसीव्ही) लस समाविष्ट करण्यात आली आहे. बालकांना एक वर्षाच्या आत पोलिओ, रुबेला व इतर विविध प्रकारच्या लशींचे डोस दिले जातात. त्यामुळे विविध आजारांपासून बालकांचे संरक्षण होण्यास मदत होते. (PCV Vaccine Will Be Given To Children In Satara District Satara Marathi News)

आता नव्याने स्ट्रप्टोकोकस न्यूमोनिया (Pneumonia) हा बॅक्टेरिया (जिवाणू) पाच वर्षांच्या आतील मुलांमधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे. न्युमोकोकल न्युमोनिया हा श्‍वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. यामध्ये पाच वर्षांखालील मुलांमध्ये होणाऱ्या न्युमोनियामध्ये ८४ टक्के मुलांना स्ट्रप्टोकोकस न्युमोनिया हा जिवाणू आहे, तसेच न्युमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ३० टक्के मृत्यू स्ट्रप्टोकोकस न्यूमोनिया या जिवाणूंमुळे होतात. न्युमोकोकस बॅक्टेरियाचा (Pneumococcus bacteria) संसर्ग झाल्याने मेंदूज्वर, सेप्टिसीमिया आणि न्युमोनियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. हा आजार संसर्गजन्य असून, तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला खोकला किंवा शिकताना संपर्कात आल्यामुळे पसरत असल्याचे निष्कर्ष काढल्याने सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पीसीव्ही लशीचा समावेश केल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: ED विषयी राष्ट्रवादी, भाजपच्या प्रमुख नेत्यांना विचारा

पाच वर्ष व विशेष करून दोन वर्षांच्या आतील मुलांना न्युमोशेकल आजार होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे मुलांना न्युमोशेकल आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत न्युमोकोकल कॉज्युगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) लस समाविष्ट करण्यात आली आहे. त्यासाठी आरोग्य सेविका अथवा आशासेविका यांच्याबरोबर संपर्क साधावा.

-डॉ. सचिन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी

हेही वाचा: हिमालयात आढळणारा 'हा' कीडा बाजारात तब्बल 9 लाखांना विकला जातो!

एका वर्षात तीन डोस

बालकांचा जन्म झाल्यानंतर पीसीव्ही लशीचे एका वर्षात तीन डोस दिले जाणार आहेत. यामधील पहिला डोस सहा आठवडे, दुसरा डोस चौदा आठवडे, तर तिसरा डोस नऊ महिन्यांच्या आत देण्यात येणार आहे. हे तीनही डोस बालकांच्या उजव्या मांडीवर दिले जाणार असल्याचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली.

PCV Vaccine Will Be Given To Children In Satara District Satara Marathi News

loading image