
वडूज : पेडगाव (ता. खटाव) येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत येथील एकाचा मृत्यू झाला. काल (शुक्रवारी) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुहास राजेंद्र गुजले (वय २७, रा. वडूज) असे मृत युवकाचे नाव आहे. मृत सुहास याच्या लग्नाचा काल (शुक्रवारी) पहिला वाढदिवस होता. रात्री कुटुंबीयांसोबत तो वाढदिवस साजरा करणार होता. मात्र, त्याअगोदरच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्यामुळे त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.