शासकीय कर्मचाऱ्यांनो खिसा रिकामा झालाय, मग 'ही' आहे तुमच्यासाठी गुड न्यूज

उमेश बांबरे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

शासनाच्या वित्त विभागाने पत्रक काढून सर्व कोषागार कार्यालये व विभागप्रमुखांकडे ते पाठविलेले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात शासकीय कर्मचाऱ्यांना मार्चचे उर्वरित वेतन मिळणार आहे.
 

सातारा : कोविडमुळे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार दोन टप्प्यामध्ये देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वेतन आता गणेशोत्सवापूर्वी देण्याची सूचना शासनाने जिल्हा प्रशासनाला नुकतीच केली आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना 60 टक्के, अधिकारी, कर्मचाऱ्यांना 50 टक्के, तर गट "क' कर्मचाऱ्यांना 25 टक्केप्रमाणे वेतन मिळू शकणार आहे.
अभिनेते सयाजी शिंदेंची झाडांशी घट्ट मैत्री...! 

कोरोनाचा संसर्ग मार्चमध्ये सुरू झाला. त्यामुळे 23 मार्चपासून संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे मार्च महिन्याचे वेतन एप्रिलमध्ये देताना दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार 25, 40, 60 टक्केप्रमाणे वेतन अदा करण्यात आले. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व विविध महामंडळांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

दिलासा... या जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी बेडसंख्येत वाढ
 
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सर्वांनाच 50 टक्‍केच वेतन अदा करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित 50 टक्के वेतन कधी मिळणार, याची शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांत उत्सुकता होती. अनेकांची तर उर्वरित पगार मिळणार नाही, अशीच भावना झाली होती. पण, तब्बल चार महिन्यांनी का होईना शासनाने मार्च महिन्यातील उर्वरित वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. हे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार गट अ, ब, क, ड प्रमाणे वेतनाची टक्केवारी ठरवून दिली आहे. त्याप्रमाणे गणेशोत्सवापूर्वी हे वेतन दिले जाणार आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना 60 टक्के तर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना 50 टक्के तर "ड' गटातील कर्मचारी यांना 25 टक्केप्रमाणे वेतन मिळणार आहे. याचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांसह विविध महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनाही मिळणार आहे.

सावधान, जशी फलटणला झाली तशी तुमचीही फसवणूक व्हायला वेळ लागणार नाही 

वित्त विभागाचे पत्रक 
याबाबत शासनाच्या वित्त विभागाने पत्रक काढून सर्व कोषागार कार्यालये व विभागप्रमुखांकडे ते पाठविलेले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात शासकीय कर्मचाऱ्यांना मार्चचे उर्वरित वेतन मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pending Salary Will Get To Maharashtra Government Employee Soon