कोरेगाव : राजकारणात मला संपवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे आज स्वतःच संपलेले आहेत. सुरुवात त्यांनी केली; पण नीतीने आज त्यांचा शेवट केला, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका केली.
सातारा जिल्हा परिषदेच्या वाठार किरोली (ता. कोरेगाव) प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत व नव्याने स्थापना होऊन मंजुरी मिळालेल्या अंबिका विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे उद्घाटन, नागरी सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री गोरे बोलत होते