cotton cultivation in Phaltan taluka 2026
esakal
आसू (जि. सातारा) : बोंडअळी व अन्य कीड-रोगांच्या प्रादुर्भावाने सुमारे २५ वर्षांपूर्वी फलटण तालुक्यातून जवळपास नामशेष झालेले ‘पांढरे सोने’ अर्थात कापूस पीक पुन्हा उभारी घेत (Phaltan cotton farming news) आहे. गेल्या सात- आठ वर्षांपासून तालुक्यात कापूस लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत असून, यंदाच्या हंगामात तब्बल ८७८ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे.