esakal | फलटणचे मराठी साहित्य संमेलन कोरोनामुळे रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

फलटणचे मराठी साहित्य संमेलन कोरोनामुळे रद्द

भरगच्च साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे व राज्यातील प्रमुख साहित्यिकांच्या व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीने या संमेलनाद्वारे यशवंतराव चव्हाणांच्या साहित्यिक, सांस्कृतिक कार्याचा खास गौरव होत असतो; पण यंदाच्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे यावर्षीचे 25 नोव्हेंबरचे नियोजित यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन सध्या तरी स्थगित करण्यात येत आहे.

फलटणचे मराठी साहित्य संमेलन कोरोनामुळे रद्द

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : दर वर्षी येथे 25 नोव्हेंबर रोजी होणारे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन यंदा कोरोना महामारीच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सध्या तरी स्थगित करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेची येथील शाखेच्या वतीने श्रीराम एज्युकेशन सोसायटी, श्री सद्‌गुरू उद्योगसमूह व यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दर वर्षी येथे 25 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकदिवसीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. भरगच्च साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे व राज्यातील प्रमुख साहित्यिकांच्या व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीने या संमेलनाद्वारे यशवंतराव चव्हाणांच्या साहित्यिक, सांस्कृतिक कार्याचा खास गौरव होत असतो; पण यंदाच्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे यावर्षीचे 25 नोव्हेंबरचे नियोजित यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन सध्या तरी स्थगित करण्यात येत आहे. यावर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुख्य विभागीय मराठी साहित्य संमेलन 27 व 28 मार्च 2020 रोजी येथे होणार होते. तेही कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते.

दुकानांत गर्दी दिसल्यास दुकान 7 दिवस बंद : जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश 

आता ही दोन्ही संमेलने संयुक्तरित्या घेण्यासाठी फेब्रुवारी- मार्च 2021 मध्ये प्रयत्नशील राहू, असे "मसाप'चे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी जाहीर केले आहे. या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व श्री सद्‌गुरू उद्योगसमूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव व संमेलनाचे कार्याध्यक्ष सचिन सूर्यवंशी-बेडके, मसाप फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांच्यासह शाखा पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे व कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्याशी चर्चा करून संमेलनाच्या नियोजित तारखा निश्‍चित केल्या जातील, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top