
फलटण : सत्यशोधक विवाह गरजेचे ; चव्हाण
दुधेबावी : महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुकरण करून कोकाटे- जाधव परिवाराने केलेला सत्यशोधक पद्धतीचा विवाह समाजाला अनुकरणीय असून, अशा विवाहांची गरज असल्याचे आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले.
चौधरवाडी (ता. फलटण) येथील तुकाराम कोकाटे यांचे चिरंजीव उदय आणि बाबासाहेब जाधव यांची कन्या सायली यांचा सत्यशोधक विवाह नुकताच वृक्ष आणि पुस्तक देऊन फलटण येथे झाला. त्या वेळी आमदार चव्हाण बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशोकराव जाधव, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, रासपचे नेते शेखर खरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, फुले आंबेडकर सोशल फाउंडेशनचे संस्थापक रघुनाथ ढोक, आकाश मोरे, सुनील खरात, प्राचार्य सुधीर इंगळे, आदर्श बहुजन शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश बोराटे, जयवंत तांबे, सरचिटणीस राजेंद्र अहिवळे, बापू गायकवाड, अजित जाधव, शुभांगीताई शिंदे, प्रवीण बनकर, मुगुटराव काळुखे आदी उपस्थित होते. सर्व निमंत्रित पाहुण्यांचे वृक्ष आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
Web Title: Phaltan Marriage Needed Society
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..