फलटण सहा खुल्या जागांवर चुरस वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

फलटण सहा खुल्या जागांवर चुरस वाढणार

फलटण शहर : पंचायत समिती निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यातील १८ गणांसाठी ११ जागा सर्वसाधारण, ४ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी ३ जागांवर आरक्षण जाहीर झाले.

शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन पाठीमागील पालिकेच्या नवीन सभागृहात आरक्षण सोडत झाली. प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत झाली.

१८ जागांवरील आरक्षणांपैकी ९ जागांवर महिलांचे आरक्षण पडले. त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५, नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये दोन तर अनुसूचीत जातीमध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यापैकी अनुसूचीत जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग ही महिलांसाठीची आरक्षणे चिठ्ठीद्वारे काढण्यात आली.

Web Title: Phaltan Reservation Lottery For Panchayat Samiti Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top