पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे छायाचित्रण करण्याचा योग

पहिल्या स्वातंत्र्यदिनी मामलेदार कचेरी, पोरे बिल्डिंगसमोर असलेल्या काँग्रेस कमिटीत झेंडा वंदन कार्यक्रम होता.
पहिला स्वातंत्र्यदिन
पहिला स्वातंत्र्यदिनsakal
Updated on

-भास्करराव बर्गे, कोरेगाव. माजी अध्यक्ष, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, सातारा

कोरेगाव मामलेदार कचेरीत (सध्याचे कोरेगाव तहसीलदार कार्यालय) पहिला स्वातंत्र्यदिन सोहळा मला केवळ पाहण्याचा, प्रत्यक्ष उपस्थित राहून ध्वजाला सलामी, वंदन करण्याचाच नव्हे तर भारत देशाच्या देदीप्यमान इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या या सोहळ्याचे प्रत्यक्ष छायाचित्रण करण्याचा दुर्मीळ योग आल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी इयत्ता सातवीत शिकत होतो. वय अवघे १२.

पहिल्या स्वातंत्र्यदिनी मामलेदार कचेरी, पोरे बिल्डिंगसमोर असलेल्या काँग्रेस कमिटीत झेंडा वंदन कार्यक्रम होता. त्या वेळी आमच्या कुटुंबात कॅमेरा होता. मी लहान असलो तरी मला फोटो काढता येत होते. त्यामुळे मला नेमके आठवत नाही कसे; पण दोन्ही ठिकाणी व शहरातील प्रभात फेरीची छायाचित्रे काढण्याची संधी मला मिळाली. मामलेदार कचेरीसमोर झेंडावंदनावेळी तत्कालीन मामलेदार रेणूकदास, काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते पांडुरंग बोराटे, सरपंच बुवासाहेबकाका बर्गे यांचा, पोरे बिल्डिंगसमोर काँग्रेस कमिटीत झेंडावंदनावेळी मामलेदार रेणुकदास, काँग्रेसचे कार्यकर्ते नाश्री महाडिक, मोतीचंद गांधी, पांडुरंग बोराटे, रजिस्टार भुजबळ, शांताराम जंगम, आबासाहेब बर्गे आदींचे छायाचित्र काढण्याचा योग आला.

पहिला स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार : डौलाने फडकावला तिरंगा

प्रभात फेरी काढली तेव्हा शहरातील तेव्हाच्या हिंद बेकरीजवळ (सध्या सम्राट गल्ली) येथे प्रभात फेरी आली असताना छायाचित्र काढता आले. स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ सुरू असताना कोणताही कार्यक्रम असो त्यात झेंडा हातात घेऊन कोरेगावचे काँग्रेसचे कार्यकर्ते बाबूराव साळुंके सर्वांच्या पुढे हजर असायचे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे रात्री १२ नंतर मशाल मिरवणूक काढलेली मी पाहिली आहे. त्यात फार लोक नव्हते मात्र युवक व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झालेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

koyana dam water storage
Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Marathi News Esakal
www.esakal.com