शेरेत 'माऊली'नं फुलवलं नंदनवन; पाच एकर जागेत तब्बल 400 वृक्षांची लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mauli Pratishthan

वर्षभरापूर्वी गावाजवळचा नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्याचा निश्चय करून माऊली प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली.

शेरेत 'माऊली'नं फुलवलं नंदनवन; पाच एकर जागेत तब्बल 400 वृक्षांची लागवड

रेठरे बुद्रुक (सातारा) : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे’ या उक्तीप्रमाणे शेरेतील नदीकाठच्या सुमारे पाच एकर मोकळ्या जागेत माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानने (Mauli Gramvikas Pratishthan) सामाजिक वनीकरण विभागाच्या (Department Of Social Forestry) सहकार्यातून ४०० वृक्षांची लागवड करून नंदनवन फुलवले आहे. गेल्या वर्षी लॉकडाउन (Lockdown) काळात दररोज २५ ते ३० युवकांनी श्रमदान करून तो परिसर हिरवाईने नटवला आहे. (Planting Of 400 Trees By Mauli Pratishthan At Rethare Budruk Satara Marathi News)

वर्षभरापूर्वी गावाजवळचा नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्याचा निश्चय करून माऊली प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली. नदीकाठच्या पाच एकर जागेत वेड्या बाभळींचे छोटे जंगल होते. ते हटवण्यासाठी वखार व्यावसायिकांनी सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्च सांगितला होता. त्यावर खर्च वाचवण्यासाठी युवकांनी श्रमदान करण्याचे ठरवले व महिनाभरात पाच एकर परिसर स्वच्छ केला.

Trees

Trees

त्यानंतर त्या मोकळ्या जमिनीत खड्डे घेऊन वनीकरण विभागाच्या माध्यमातून ४०० झाडांचे वृक्षारोपण केले. नारळ, आंबा, चिंच, जांभूळ, आवळा, वड व पिंपळ या झाडांचा समावेश करून पाण्याची पाइपलाइन अंतरून लागवड केली. वर्षपूर्तीनंतर झाडांची व्यवस्थित देखभाल केल्याने झाडे चांगली बहरली आहेत. कोरोना काळात संचारबंदीत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थित पाणी घालणे, प्राण्यांपासून संरक्षणासाठी कुंपण घालणे आदी दक्षता घेतल्याने सर्व झाडे जगली आहेत व ती बहरली आहेत.

‘शेरे हे झाडांचं गाव’ म्हणून ओळख करून देण्यासाठी प्रतिष्ठान कार्यरत आहे. त्यासाठी पुढील सात ते आठ वर्षे सलग काम करण्याचा आमचा मानस आहे.

Planting Of 400 Trees By Mauli Pratishthan At Rethare Budruk Satara Marathi News