
फलटण शहर (सातारा) : भेळ खायला देण्याच्या आमिषाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार फलटण तालुक्यात एका गावात घडला. या प्रकरणी धनंजय बाजीराव गायकवाड (वय २८ ) याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा (Pocso Crime) दाखल झाला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. (Pocso Case Filed Against One People In Minor Girl Abuse Case Crime News)
मुलीचे वडील बाहेरगावाहून घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगण्यात आला.
याबाबत शहर पोलिस ठाण्यातून (Phaltan City Police Station) मिळालेली माहिती अशी, की धनंजय बाजीराव गायकवाड याने ता. २६ जुलै रोजी दुपारी दोन ते सव्वादोन वाजण्याच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलींना भेळीचे आमिष दाखवून स्वतःच्या घरात नेत अत्याचार केला. यानंतर त्याने मुलींना हा प्रकार कोणालाही सांगायचा नाही, असा दमही दिला. परंतु, या प्रकाराची माहिती एका मुलीने आईला दिली.
मुलीचे वडील बाहेरगावाहून घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर या घटनेबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली. या घटनेतील संशयित धनंजय गायकवाड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. याचा तपास पोलिस निरीक्षक भारत किंद्रे व सहायक तपासी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करीत आहेत.
Pocso Case Filed Against One People In Minor Girl Abuse Case Crime News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.