esakal | Hotspot भागात लग्नानंतर 'धिंगाणा'; लग्न मालकासह, DJ पार्टीवर पाेलिसांची धडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

DJ Party

Hotspot भागात लग्नानंतर 'धिंगाणा'; लग्न मालकासह, DJ पार्टीवर पाेलिसांची धडक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेढा (सातारा) : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभातील (Wedding Ceremony) संख्येवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध जुगारून जावळी तालुक्‍यातील कुसुंबी येथील लग्न समारंभात मर्यादेपेक्षा जास्त लोक उपस्थित राहिल्याने ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) संबंधितांवर कारवाई केली. संबंधित लग्न मालकाला 50 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने, तसेच जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई (Police Action) करण्यात आली आहे. कुसुंबी येथे एका विवाहात 100 पेक्षा जास्त व्यक्ती लग्नाला उपस्थित राहिले होते. (Police Action Against DJ Party In Patan Taluka Of Satara Crime News)

संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यांसह धार्मिक, राजकीय, सामाजिक स्वरुपाच्या जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, साताऱ्यात कोरोनाचा हॉटस्पॅाट ठरलेल्या पाटणात लग्नानंतर धिंगाणा घालण्यात आला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांनी कारवाई केली आहे.

गोवा लॉकडाउन झालेय! तुम्हीही साता-यात आहात, त्यांना जागे करा

कोयनानगर कोरोनाच्या काळातील निर्बंध झुगारून लग्नाला गर्दी करणाऱ्यांवर रासाटी येथील ग्रामसमितीने कारवाई केली. लग्न मालकास 10 हजार रुपयांचा दंड केला आहे. कोयना विभागात कोरोनाचा कहर आहे. शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. तरीही त्याची पायमल्ली होत आहे. भागात लग्नसराई जोरात सुरू आहे. अशाच एका लग्न समारंभावर नुकतीच कारवाई झाली. रासाटी येथे विवाह समारंभास सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर केला नाही, गर्दी केल्यामुळे रासाटी येथील ग्रामसमितीने लग्न मालकावर कारवाई केली. लग्न मालकाकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला आहे. गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, कोयनेचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Police Action Against DJ Party In Patan Taluka Of Satara Crime News

loading image