esakal | साताऱ्यात रुग्ण वाढले; नियमांची अंमलबजावणी सुरु, दुकानदारांसह हॉटेलचालकांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यात रुग्ण वाढले; नियमांची अंमलबजावणी सुरु, दुकानदारांसह हॉटेलचालकांवर कारवाई

त्यामुळे जिल्हाभरात पोलिसांसह आरोग्य यंत्रणा, पालिका व महसूल विभागाकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

साताऱ्यात रुग्ण वाढले; नियमांची अंमलबजावणी सुरु, दुकानदारांसह हॉटेलचालकांवर कारवाई

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राबवायच्या उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (ता. 22) दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर साताऱ्यातील दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, जिल्हाभरात मास्क न वापरणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
 
या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या संख्येबाबतचा, तसेच सध्या राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल. अनलॉक प्रक्रियेनंतर नागरिकांच्यात वाढलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.

सातारकरांनाे! लॉकडाउन टाळणे आपल्याच हाती; अशी घ्या काळजी

त्यामुळे जिल्हाभरात पोलिसांसह आरोग्य यंत्रणा, पालिका व महसूल विभागाकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सुरू असली, तरीही बाजारपेठांमध्ये शारीरिक अंतराचा नियमाचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे दुकानदारांसह हॉटेलचालकांवर कारवाई करण्याचा सपाटाही पोलिसांनी लावला आहे. दरम्यान रविवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानूसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब 78 (827 ),  खाजगी - 10 ( 63) ऍन्टीजन -05 (114 )  असे सर्व मिळून 93 (1004 ) जण बाधित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

संतापाशी बहू असावी मर्यादा शिकवण द्यावी लागेल; पंढरीच्या मठातील धरपकडीवर अक्षयमहाराज आक्रमक

ग्रामपंचायतीचा कर भरा अन्‌ सोने जिंका

सहकारी संस्थांनी विरोधकांच्या भूमिकेला बळी पडू नये

कोरोनाची दुसरी लाट पुन्हा डोक वर काढत आहे. खबरदारी घ्या अन्यथा पुन्हा लॉकडाउनची शक्‍यता नाकरता येत नाही

Edited By : Siddharth Latkar