esakal | दहिवडी-नातेपुते मार्गावर मोटारसायकल चोरट्यांना शिताफीने अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Motorcycle

हवालदार संजय केंगले व रवींद्र बनसोडे यांनी अतिशय शिताफीने दोन्ही चोरट्यास ताब्यात घेण्यात यश मिळवले.

दहिवडी-नातेपुते मार्गावर मोटारसायकल चोरट्यांना शिताफीने अटक

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : मोटारसायकल (Motorcycle) चोरट्यांना दहिवडी पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा एक आठवड्यातच शोध लावण्यात यश आले आहे. याबाबतची माहिती अशी, चैतन्य कुंभार (रा. मलवडी, ता. माण) यांची मोटारसायकल त्यांच्या घरासमोरून ३० मे रोजी रात्री दहा ते ३१ मे सकाळी सातच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबतची फिर्याद त्यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात (Dahiwadi Police Station) नोंदवली. (Police Arrest Motorcycle Thieves In Dahiwadi Satara Crime News)

या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी विविध ठिकाणी तपास करण्यास सुरुवात केली. चैतन्य कुंभार हे नातेपुतेला जात असताना ही मोटारसायकल घेऊन एक व्यक्ती दहिवडी-नातेपुते रस्त्याच्या (Dahiwadi-Natepute Road) बाजूला उभी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही बाब पोलिस ठाण्यात कळवली. मोटारसायकल ताब्यात घेऊन त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता सुरेश बाबू मदने (वय २०, मूळ रा. नवलेवाडी, ता. माण, सध्या रा. जाखणगाव (रामोशीवाडी, ता. खटाव) व एक बालक यांनी मोटारसायकल चोरल्याची माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक हजारे व प्रकाश हांगे, हवालदार संजय केंगले व रवींद्र बनसोडे यांनी अतिशय शिताफीने दोन्ही चोरट्यास ताब्यात घेण्यात यश मिळवले. बालकास सातारा येथील बाल न्याय मंडळ येथे हजर केले आहे. सुरेश मदने यास अटक करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील २७ गावे लाॅक; प्रशासनाचा निर्णय

Police Arrest Motorcycle Thieves In Dahiwadi Satara Crime News

loading image
go to top